आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी दरा वाढ:डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8.30%, महाराष्ट्रात 3.1%

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात बेरोजगारीचा दर डिसेंबर २०२२ मध्ये वाढून ८.३० टक्क्यांवर पोहोचला आहे. तो १६ महिन्यांत सर्वाधिक आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये बेरोजगारी दर ८.३२% होता. डिसेंबर २०२१ मध्ये तो ७.९१% आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये ८% होता. प्रामुख्याने शहरी भागांत बेरोजगारी दर वाढल्याने ही वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये शहरी भागात बेरोजगारी दर १०.०९ टक्क्यांवर पोहोचला. तो नोव्हेंबरमध्ये ८.९६% होता, तर ग्रामीण भागात दरात किरकोळ घट झाली. तो डिसेंबरमध्ये ७.४४% राहिला, तर नोव्हेंबरमध्ये ७.५५% होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) एमडी महेश व्यास म्हणाले, बेरोजगारी दरातील वाढ तितकी वाइट नाही, जितकी भविष्यात दिसू शकते. गेल्या महिन्यात कामगार भागीदारी दरात वाढ झाली आहे. ती डिसेंबरमध्ये वाढून ४०.४८% वर पोहोचली. ही १२ महिन्यांत सर्वाधिक आहे. महत्त्वाचे म्हणजे डिसेंबरमध्ये रोजगार दर वाढून ३७.१% झाला. तो जानेवारी २०२२ नंतर सर्वाधिक आहे. आगामी महिन्यांत महागाई रोखणे व लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे सरकारसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.

सर्वात जास्त हरियाणा ३७.४% राजस्थान २८.५% दिल्ली २०.८% बिहार १९.१% झारखंड १८%

सर्वात कमी ओडिशा ०.९% गुजरात २.३% कर्नाटक २.५% मेघालय २.७% महाराष्ट्र ३.१%

बातम्या आणखी आहेत...