आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:मे महिन्यात बेरोजगारी दर 11.9%; वर्षभराचा उच्चांक, एप्रिलमध्ये 7.97% होता बेरोजगारी दर : सीएमआयई

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मे महिन्यात देशातील बेरोजगारी दर ११.९% टक्क्यांवर गेला आहे. ही गेल्या वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. एप्रिलमध्ये हा दर ७.९७% होता. ही माहिती सेंटर फॉर मानिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) ताज्या आकडेवारीत समोर आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी विविध राज्यांत लॉकडाऊन केल्यामुळे बेरोजगारी दरात वाढ झाली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीत खूप वाढ झाली आहे. शहरी भागातील बेरोजगारी दर मेमध्ये १४.७३% वर गेला. तो एप्रिलमध्ये ९.७८% होता. ग्रामीण भागातील बेरोजगारी दर मेमध्ये १०.६३% झाला आहे. एप्रिलमध्ये तो ७.१३% होता. कन्झ्युमर सेंटिमंेट निर्देशांक मेमध्ये घटून ४८.६% झाला. तो एप्रिलमध्ये ५४.४% होता. सीएमआयईने आपल्या विश्लेषणात म्हटले की, “कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशातील आर्थिक घडमोडींना ब्रेक लावला. भारताने लोकांचे उत्पन्न आणि त्यांच्या मनोवृत्तीत खूप सुधारणा करण्याची गरज नाही. देशाच्या आर्थिक सुधारणेत लोकांकडून योगदानाची आशा ठेवता येईल.’

बातम्या आणखी आहेत...