आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा आज मुंबईत:भाजपची जय्यत तयारी, उद्या 'मिशन मुंबई महापालिके'चा करणार शुभारंभ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आज रात्री 9.30 च्या सुमारास मुंबईत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत भाजपतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भाजपतर्फे अमित शहा यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.

अमित शहा उद्या लालबागचा राजा व सिद्धिविनायक या प्रमुख गणपतींचे दर्शन घेणार आहेत. तसेच, अमित शहांच्या उपस्थितीत भाजपतर्फे ‘मिशन मुंबई महापालिके’चा शुभारंभ करण्यात येणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांचे पुत्र जय शहा आज सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच, अमित शहांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

उद्या महत्त्वाची बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी अमित शहांच्या नेतृत्वात उद्या बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याह भाजपचे प्रमुख नेते हजर राहणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरगुती गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.

ठाकरेंची सत्ता उलथवण्याची रणनीती
29 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ती काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा शुभारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते. आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने 'मिशन 200'ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...