आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्र्यांची कर्तव्यदक्षता!:केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराडांनी सर्व प्रोटोकॉल बाजुला ठेवत विमानातच केले आजारी प्रवाशावर उपचार

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे खासदार भागवत कराड हे पेशाने डॉक्टर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेल्या डॉक्टर भागवत कराड यांनी विमान प्रवास करताना एका प्रवासावर उपचार केले. त्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत विमानात एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहेत. इंडिगो एअरलाईन्समध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार स्वत: मंत्री भागवत कराडांनी सोशल मीडियावर शेअर केला.

केंद्रीय मंत्री भागवत कराड हे 15 ऑक्टोबर रोजी इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटने प्रवास करत होते. यावेळी हा प्रसंग घडला. मंत्री भागवत कराड हे विमान प्रवास करत होते. दरम्यान डॉ भागवत कराड यांच्या मागील बाजुच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांचा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी भागवत कराडांनी थोडाही विलंब न करता त्या प्रवाशावर उपचार केले.

सोशल मीडियावर भागवत कराड यांनी लिहिले की...
'काल प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइट IndiGo मध्ये 12 A सीट वर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरु झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. " एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ " संतांची हि शिकवन कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या.'

बातम्या आणखी आहेत...