आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन आशीर्वाद यात्रा:जनता महाविकास आघाडी सरकारला कंटाळली, उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करत आहेत -नारायण राणे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीसांचे मानले आभार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई विमानतळावरुन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. दरम्यान, राणे यांनी दादर येथील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला कंटाळली असून हे सरकार राज्याचा कोणताच विकास करु शकत नसल्याचा टोला राणे यांनी यावेळी लगावला आहे. यावेळी राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात भाजपची सत्ता यावी अशी अपेक्षा जनतेला आहे व त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

फडणवीसांचे मानले आभार
केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात नारायण राणे यांना संधी मिळाल्याबद्दल त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभार मानला आहे. यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचादेखील ऋणी असल्याचे ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...