आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का?, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल; चौकशी लावण्याचा इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले- देवेंद्र फडणवीस आणि मोदींवरील टीका सहन करणार नाही - Divya Marathi
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले- देवेंद्र फडणवीस आणि मोदींवरील टीका सहन करणार नाही

मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का, वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर नारायण राणे आक्रमक झालेत.

उद्धव ठाकरे खोटारडा माणूस आहे. यापुढे भाजप नेतृत्वावरील टीका सहन करणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

न शोभणारी भाषा

नारायण राणे म्हणाले की, राज्याचे माजी निष्क्रिय मुख्यमंत्री हे काल ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला गेले होते. माझ्याकडे डॉक्टरचे सर्व कागदपत्रे असून डॉक्टरांनी त्यांना काही झाले नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना चांगले बोलता येते का, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा त्यांनी काल केली. तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुशांत, दीक्षा सालियान, यांना प्रकरणाचे काय झाले. वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? असा सवाल ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांशिवाय काय ओळख?

नारायण राणे म्हणाले की, देशाबाहेरील शक्तीसोबत संबंध असलेल्या लोकांना मंत्री केले , त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा काही केले नाही. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. बाळासाहेब असते तर हे कधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा त्याग करुन पद मिळवले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाशिवाय कुणी विचारत नाही.

कोरोना काळात पैसै खाल्ले

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे बघून कुणी शिवसेनेत प्रवेश केला का? मुख्यमंत्री असताना त्यांचे नेतृत्व कुणी स्वीकारले का?असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. तर कोरोनाच्या काळात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून औषधींच्या प्रत्येक टेंडरमधून 15 टक्के पैसे घेण्यात आले.

भाजपमुळे आमदार निवडून आले

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कार्यशुन्य आणि खोटारडा माणूस आहे. रोशनी शिंदे मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्याची औकात आहे का? मी जर पक्षात असतो तर तिला समजावून सांगितले असते. मात्र, उद्धव ठाकरेंनी तिची बाजू घेतली, सत्ता गेल्याच्या भावनेतून हे सर्व काही सुरू आहे. उद्धव ठाकरेंना देशाचे आणि राज्याचे प्रश्नच माहित नाही. त्यांनी चर्चेसाठी यावे मग बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलात का शिष्य कुणामध्ये अक्कल आहे हे तुम्ही ठरवा, त्यांना शब्दांचा अर्थ तरी कळतो का?. जर भाजपने 2014 आणि 2019 ला उद्धव ठाकरेंसोबत युती केली नसती त्यांना आधार दिला नसता तर शिवसेनेचे आमदार निवडून आले नसते, असेही राणेंनी म्हटले आहे.

हा माणूस मातोश्रीच्या तरी कामाचा आहे का?

नारायण राणे म्हणाले की, माझी सुपारी देऊन माझे काही वाकडे करु शकले नाही, कुटुबांला ज्याने सोडले नाही, त्यांनी कार्यकर्त्यांना सोडले नाही. कुणी कार्यकर्ता मोठा होत असेल तर त्यांना ते खपले नाही म्हणून त्यांनी नारायण राणे असो की एकनाथ शिंदे यांना बाहेर काढले. हा माणूस देशाच्या, राज्याच्या तर सोडाच मातोश्रीच्या तरी कामाचा आहे का?. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लायकी तरी आहे का? तुमच्याकडे कोणते गुण आहेत. केवळ खुर्चीवर बसण्याचा विषय आहे का? स्पेशल खुर्ची शिवाय उद्धव ठाकरेंना बसता येत नाही. त्यांना बसण्यासाठी देखील टेकन लागते असा टोला राणेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहत अजित पवार यांची मजा घेतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

बाळासाहेबांमुळे वाचले

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी 2030 साली भारत 3 रा मोठा देश असेल असे मोदींनी सांगितले. कोणत्या तरी एका संस्थेकडून बेस्ट मुख्यमंत्री म्हणवून घेतात. फडणवीसांनी जर पाठ दाखवून बोट दाखवले तर उद्धव ठाकरे कधीच कारागहात गेले असते. केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तुम्ही बाहेर आहात. शिवसैनिकांना आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी काय दिले?.

दोन्ही बंगले लिगल?

नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे जिथे भाषण करतात ते सेम असते, खेड, औरंगाबाद असे म्हणत तुम्ही तिथे कॅमेरे न पाठवता खेड सारखे भाषण आहे असे सांगा. उद्धव ठाकरेंना आता महाराष्ट्रात भवितव्य नाही, त्यांच्सामागे कुणीही जाणार नाही. मुख्यमंत्री असताना गुंडगिरी संपविली का नाही. देवेंद्र फडणवीस सर्व गोष्टी सांभाळायला समर्थ आहे. मातोश्री नावाचे दोन्ही बंगले हे लिगल आहे का? हे आमचे अधिकारी चेक करतील असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

सामना का सुरू ठेवला?

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, सामना हे वृत्तपत्र राज्यात सुरू रहावे का याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यायला हव. याविरोधात मी तक्रार दाखल करणार आहे.