आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचा मला मारण्याचा होता डाव:नारायण राणेंचा आरोप, म्हणाले - छोटा राजन आणि शकीलला हत्येसाठी दिली होती सुपारी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकीलला सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत आज केला.

माझ्या घराला टार्गेट करणाऱ्यांना सोडणार नाही, उद्धव ठाकरेंना पुरून उरेन, असा प्रतिहल्लाही नारायण राणे यांनी केला.

ठाकरेंना पुरून उरेन

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे लबाड लांडग्यासारखे आहेत. ते खूप खोटे बोलतात. उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितले. मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली. मात्र, मी आज जिवंत आहे. मला कोणीच मारू शकले नाही. मीउद्धव ठाकरे यांना पुरून उरेन, असा इशाराही त्यांनी दिला.

टीका सहन करणार नाही

कालचा मेळावा म्हणजे तमाशाकारांचा मेळावा होता. मेळाव्यात आमच्या नेत्यांवर टीका केली. पण ही टीका थांबवली नाही अन् उद्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असतील हे मी आधीच सांगितले आहे. आमच्या नेत्यांवरील टीका आम्ही सहन करणार नाही असेही राणे म्हणाले.

जाणीव करून दिली पाहिजे

मोठ्या माणसांवर टीका केल्याने आपण खूप मोठे झालो असे त्यांना वाटत असेल. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांवर टीका केली. आपण कोण आहो याची जाणीव या माणसाला करून दिली पाहिजे असे राणे यावेळी म्हणाले. तुम्ही कोण आहात? अपघाताने मुख्यमंत्री झाला आहात. अडीच वर्षांत अडीच तास मंत्रालयात आले असे राणे म्हणाले.

तेव्हा एक माणूस निघत नव्हता

यांनी महाराष्ट्राच्या विकासात काय योगदान दिले. मराठी माणसासाठी काय केले? एक तरी काम मेळाव्यात सांगितले पाहिजे होते, की हा उजेड मी पाडला. लोकं विरळ विरळ बसले होते. उद्धव ठाकरे बोलायला लागले तेव्हा उजव्या बाजूने लोक निघून जात होते. बाळासाहेब ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा जागेवरून एक माणूस निघत नव्हता असेही राणे म्हणाले.

वक्त्यांचा दर्जाही घसरला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आम्ही चेंबूरवरून दसरा मेळाव्याला येत होतो. तेव्हा वक्त्यांचा आवाज होता. आताच्या वक्त्यांची नावे घेणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात वक्त्यांचाही दर्जा घसरला आहे. या वक्त्यांची बौद्धिक पातळी काय होती? त्यांना विधायक कामाचा काय अनुभव होता? केवळ राणेंवर टीका करण्यासाठी ही लोकं आणली होती, असे राणे यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...