आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारत्नागिरीतील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा जो कारखाना होत आहे, तो सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा आहे. हा कारखाना व्हावा, यासाठी कोकणातील केंद्रीय मंत्र्यांपासून अनेकांना मोठ्या प्रमाणात खेके दिले गेले आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
गुंतवणुकीपासून काहींना दलाली
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, सौदी अरेबियाच्या राजपुत्राची गुंतवणूक बारसूत होत आहे. त्या गुंतवणुकीची किकबॅक म्हणून काही पैसे आधीच काहींना देण्यात आली आहे. काही जणांना या गुंतवणुकीपासून दलाली मिळाली आहे. त्यासाठीच परप्रांतियांनी बारसूत जमिनी गिळल्या आहेत आणि हे सरकार या परप्रांतियांचे संरक्षण करत आहेत.
आतापर्यंत एवढे खोटे सरकार पाहीले नाही
संजय राऊत म्हणाले, बारसूत शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या. ते त्यावर शेती करत होते. मात्र, प्रकल्प येणार हे कळताच परप्रांतियांनी जमीन खरेदी करून स्थानिकांची फसवणूक केली. या प्रकल्पासाठी अब्जो रुपयांची डील झाली आहे. सरकार म्हणत आहे बारसूत बाहेरील काही लोक आंदोलन करत आहेत. एवढे खोटे सरकार इतिहासात झाले नसेल. बारसूत ज्या स्थानिकांच्या जमिनी गेल्या आहेत, तेच आता आंदोलनात उतरले आहेत.
आंदोलक पाकिस्तानचे आहेत काय?
संजय राऊत म्हणाले, बारसूत आंदोलन करणारे लोक पाकिस्तानचे आहेत का?, हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. परप्रांतिय जमीनदारांना संरक्षण देण्यासाठी सरकार स्थानिकांवर अत्याचार करत आहे. या अन्यायाविरोधात उद्धव ठाकरे हे कोकणला भेट देऊन स्थानिकांची बाजू ऐकून घेणार आहेत. जे आम्हाला येऊन दाखवा, असे सांगत होते, त्यांच्यासाठी आमचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
आता पुढची 10 वर्षे BMC निवडणूक नाही
संजय राऊत म्हणाले, काल मुंबईत मविआच्या ऐक्याची वज्रमूठ दिसली. बीकेसीत केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही तेवढेच लोक होते. जे लोक या सभेला छोटी सभा होत आहे, त्यांनी आपल्या डोळ्याच ऑपरेशन करावे. मविआची ही विराट सभा पाहून विरोधकांच्या पोटात गोळा येणे स्वाभाविक आहे. आमची कालची सभा पाहून दिल्लीत गुप्त बैठक झाली असेल त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील 10 वर्षे घेऊ नका, असा ठराव झाला असेल, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. देशात, राज्यात सत्ता परिवर्तानाच्या दिशने पावले पडत आहेत.
संबंधित वृत्त
हजामत:आमदार संतोष बांगरांनी मिशा काढल्यात का? नाहीतर एखाद्याला भादरायला पाठवतो; संजय राऊतांचा टोला
आमदार संतोष बांगर यांनी मिशा काढल्या आहेत का? नसेल काढल्या तर एखाद्याला हजामत करायला पाठवतो, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना लगावला आहे. कळमनुरी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक सर्वच्या सर्व 17 जागा निवडून आणल्या नाही तर मिशा काढून टाकेल, अशी घोषणा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला होता. मात्र, कळमनुरी बाजार समितीत बांगर गटाच्या केवळ 5 जागा निवडून आल्या. तर, महाविकास आघाडीने 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे संतोष बांगर आता अडचणीत आले असून विरोधकांकडूनही त्यांना जोरदार चिमटे काढले जात आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.