आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांचा हल्ला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला छत्रपती शिवाजी पार्क परिसरात गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुमारे चार ते पाच अज्ञातांनी स्टम्प आणि लोखंडी रॉडने देशपांडेंवर हल्ला केला.

हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेचे विधानसभेतही राजकीय पडसाद उमटले. याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देशपांडेंच्या हल्ल्यावर ‘सर्वसामान्यांचे सरकार असल्यावर असेच होणार’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे, भाजप आमदार नितेश राणे यांनी या हल्ल्याच्या संदर्भाने ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...