आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:अनलॉकची रणनीती चुकली; राज्यात जिम सुरू करा, विरोधी पक्षनेते फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही

राज्यातील अनलॉक करण्याची रणनीती चुकली असून जिम तत्काळ सुरू करण्यात यावे. तसेच हळूहळू सर्वच क्षेत्रांचा विचार करून अर्थकारणाला चालना देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन ती क्षेत्रे खुली करायला हवी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

कोरोनामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. आज राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवणे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचे अर्थकारण टिकले पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण, राज्याचे आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे, हा विचार आपण का करू शकत नाही? असा सवाल पत्रात फडणवीस यांनी केला आहे.

निर्णयशीलता दिसत नाही

फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही. सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारशी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार, याचा तपशील सरकारला सादर करून ती क्षेत्र खुली करण्याची विनंती करीत आहेत. असे असताना सुद्धा सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही, ही फारच दुर्दैवाची बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...