आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:यूपीचे सीएम योगी मुंबईमध्ये बॉलीवूड निर्मात्यांना भेटणार; महाविकास आघाडीचा तिळपापड, भाजपकडून स्वागत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २ डिसेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यावर महाविकास आघाडीकडून टीका तर भाजपकडून समर्थन सुरू आहे.

योगी आदित्यनाथ १ डिसेंबर रोजी मुंबईला येण्यासाठी उत्तर प्रदेशमधून रवाना होतील. १ डिसेंबरच्या रात्री मुंबईत पोहोचतील. त्यानंतर २ डिसेंबर रोजी ते मुंबई शेअर बाजाराला भेट देतील. या वेळी महाराष्ट्रातील उद्योगपती तसेच बॉलीवूड निर्मात्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत उद्योगपती तसेच बॉलीवूड निर्मात्यांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याचे ते आवाहन करणार आहेत. उद्योगपती रतन टाटा, आदित्य बिर्ला, मुकेश अंबानी असे बडे उद्योगपती या बैठकीत सहभागी होणार आहेत.

दुपारी दोन वाजता योगी हाॅटेल ट्रायडंट येथे माध्यमांशी संवाद साधणार आहेत. योगी यांच्या मुंबई दौऱ्याचे भाजपने स्वागत केले आहे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने टीका केली. योगींनी कितीही प्रयत्न करावेत, बाॅलीवूड बाहेर जाणे शक्य नाही, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दावा केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser