आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या षटकात षटकाराने विजय:यूपी वाॅरियर्जने लावला मुंबई इंडियन्सच्या विजयी माेहिमेला ब्रेक ; यूपी वाॅरियर्ज संघ 5 गड्यांनी विजयी

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेफिया एक्लेस्टाेनने (नाबाद १६) शेवटच्या षटकात षटकार खेचून यूपी वाॅरियर्ज संघाला शनिवारी महिला प्रीमियर लीगमध्ये राेमहर्षक विजय मिळवून दिला. कर्णधार अलिसा हिलीच्या नेतृत्वाखाली यूपी वाॅरियर्ज संघाने लीगमधील मुंबई इंडियन्सच्या विजयी माेहिमेला ब्रेक लावला. वाॅरियर्ज संघाने १९.३ षटकांत ५ गड्यांनी सामना जिंकला. यासह हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या मुंबई संघाचा सलग सहाव्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. संघाला यंदा पहिल्या लीगमध्ये पहिल्याच पराभवाला सामाेरे जावे लागले. दरम्यान, यूपी वाॅरियर्ज संघाला तिसरा विजय साजरा करता आला.प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने निर्धारित २० षटकांमध्ये १२७ धावांवर आपला डावा गुंडाळला. प्रत्युत्तरात युपी वाॅरियर्ज संघाने ३ चेंडू आणि पाच विकेट राखून विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयासाठी सामनावीर दीप्तीची अष्टपैलू कामगिरी माेलाची ठरली. तिने नाबाद १३ धावांसह दाेन बळी घेतले. तसेच साेफियाने नाबाद १६ धावांसह तीन विकेट घेतल्या. त्यामुळे संघाला स्पर्धेत तिसरा विजय नाेंदवता आला. या सामन्यात मुंबई संघाची फलंदाजी आणि गाेलंदाजी निराशाजनक ठरली. त्यामुळे टीमला आपला पराभव टाळता आला नाही. याचाच फायदा घेत यूपी वाॅरियर्ज संघाला आपला विजय साजरा करता आला. संघाची आता प्लेऑफ प्रवेशाची आशा कायम आहे.

बंगळुरूचा सलग दुसरा विजय; गुजरात संघाचा पराभव स्मृतीच्या नेतृत्वाखाली राॅयल चँलेजर्स बंगळुरू संघाने आपली लय कायम ठेवताना महिला प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. सामनावीर साेफिया डेव्हिनेने (९९ धावा, १ बळी) अष्टपैलू खेळीतून शनिवारी बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. याच खेळीच्या बळावर बंगळुरू संघाने लीगमधील आपल्या सातव्या सामन्यामध्ये गुजरात जायंट्सवर मात केली. बंगळुरू संघाने १५.३ षटकांमध्ये ८ गड्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ बाद १८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरामध्ये बंगळुरू संघाला २ गड्यांच्या माेबदल्यामध्ये विजयश्री खेचून आणता आली. गुजरात संघाला पाचव्या पराभवाला सामाेरे जावे लागले.

बातम्या आणखी आहेत...