आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचा हल्लाबोल:म्हणाले- संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर; फक्त आरोप काय करता? पुरावेही द्या? राऊतांना सवाल

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

काय म्हणाले नारायण राणे?
पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता, असे राणे म्हणाले आहेत. ती एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका देखील केली. संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे म्हणाले, स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल बेताल आरोप केले आहे. प्रविण राऊत याने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाही, असेही राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...