आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल:विरोधकांना धमकावणे हीच लोकशाही आहे का? मोदी, शहांना राऊतांचा सवाल; म्हणाले- हा ट्रेलर होता...पिक्चर अभी बाकी है!

मुंबई6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर आरोप लगावले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां* ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या पत्रकार अपडेट...

 • देवेंद्र फडणवीसांचा फ्रंटमॅन मोहित कंबोज, कंबोज फडणवीसांना बुडवणार.
 • मला कुणीतरी म्हटले की, तुम्ही जिथे कपडे शिवले तिथेही गेले. ईडी हा काय प्रकार आहे हे तुम्हाला कळले पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो. टेलरकडेसुद्धा हे लोक गेले, किती पैसे दिले, किती सुट दिले. आता फक्त चप्पल वाल्याकडे जायचे बाकी राहिले आहे.
 • तुम्ही कुठेही जा पण सामना शिवसेनेशी आहे. एक दुधवाला आहे हरयाणाचा, एस नरवल, मी विचारतो ईडीला की तुम्ही त्याला ओळखता का, फक्त पाच वर्षात दुधवाला, 7 हजार कोटीचा मालक कसा बनतो, कुणाचा पैसा? जेव्हापासून महाराष्ट्रात भाजपचे सरकार आले. तेव्हापासून महाराष्ट्रात येणे जाणे सुरु झाले. भाजपच्या नेत्यांच्या घरात येणे जाणे सुरु होते आणि त्याची संपत्ती वाढली. कुणी केले मनी लाँड्रिंग, 7 हजार कोटी रुपयांपैकी साडे तीन हजार कोटी हे महाराष्ट्रातून गेली.
 • ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या...मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू...तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल.
 • चार महिन्यांपासून बिल्डर्सकडे वसुली सुरु आहे. ईडीच्या नावाने वसुली होत आहे. याची ईडीला सुद्धा माहिती आहे. हे कोण आणि कोणाची माणसे याचा डेटा आहे. मी सर्वात आधी पंतप्रधान मोदींना, अमित शहांना देणार आणि त्यानंतर तुम्हाला सांगेन...जितेंद्र नवलानी, फरिद शमा, रोमी आणि फिरोज शमा कोण?
 • महाराष्ट्रात जो घोटाळा, भ्रष्टाचार झाला त्यातून हे झाले. महाराष्ट्रात सर्वात मोठा घोटाळा आहे तो फडणवीस सरकारच्या काळातला आहे.
 • कोरलाईत जर 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडणे, पण जर कोरलाई 19 बंगले दिसले नाही तर त्या दलाला जोड्याने मारेण.
 • जे माझ्यावर आरोप झालेत, त्यातील एकही आरोप खरा नाही.
 • ईडीच्या कार्यालयासमोर आजची पत्रकार परिषदेत घेण्याची योजना करणार होतो. पण शेवट तिथे करण्याचा निर्णय घेतला.
 • सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात ठिणगी पाडू, आम्ही केंद्रीय पोलिस यंत्रणा आणून थंड करु.
 • अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करतायत ते देशावरचे संकट आहे. असेच संकट पश्चिम बंगालवरही आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप, बदनामी सुरु आहे.
 • मराठी माणसाविरुद्ध होणाऱ्या आक्रमणांच्या विरुद्ध रणशिंग फुंकणे गरजेचे आहे आणि ते काम आम्ही करत आहोत. आम्हाला संदेश द्यायचाय की, आम्ही घाबरणार नाही, असे संजय राऊत म्हणाले आहे.
 • महाराष्ट्र ....ची औलाद नाही हेच आजच्या पत्रकार परिषदेतून सांगायचे आहे. तुम्ही कितीही नामर्दानगी करुन आमच्या पाठीमागून वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही.
 • गेल्या काही दिवसांपासून तुम्ही पाहत आहात. शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल. आनंदराव अडसूळ असतील. अनिल परब असतील, भावना गवळी, पवार साहेबांचे कुटुंबीय अशा सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पध्दतीने हल्ले करत आहेत. मला असे वाटते की, हे महाराष्ट्रावरच नाही तर देशावरचं संकट आहे.
पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शिवसेना भवनासमोरील छायाचित्र टाकून ‘जय महाराष्ट्र’ म्हटले.
पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शिवसेना भवनासमोरील छायाचित्र टाकून ‘जय महाराष्ट्र’ म्हटले.

केंद्रीय यंत्रणांच्या धमक्यांना घाबरत नाही -
याआधी सोमवारी संजय राऊत म्हणाले की, आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या धमक्यांना घाबरत नाही. अनिल देशमुख यांच्या बाजुला असलेल्या तुरुंगात टाकू, अशी धमकी जे आम्हाला देत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की भाजपच्या लोकांना त्याच तुरुंगात टाकण्याची तयारी करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही दिवसांत तुरुंगातून बाहेर येणार आहेत. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना भवन हे महाराष्ट्रातील सत्ताकेंद्र आहे. येथेच बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याला नवी दिशा दिली.

यामुळे नाराज आहेत संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने संजय राऊत यांच्या कुटुंबीयांवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी अंमलबजावणी संचालनालयाने 55 लाख रुपयांच्या प्रकरणी पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी केली होती. यानंतर ईडीने संजय राऊत यांचा जवळचा सहकारी प्रवीण राऊत यालाही अटक केली. एवढेच नाही तर त्यांच्या मुलीच्या लग्नात काम करणाऱ्या डेकोरेटरचीही अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली होती. याशिवाय लालू यादव यांच्याप्रमाणे राऊत यांनाही तुरुंगात टाकण्याची धमकीही भाजप नेत्यांकडून देण्यात आली होती. शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या चौकशीत आहेत. यामुळे संजय राऊत संतापले आहेत.

बातम्या आणखी आहेत...