आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसीआर-उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद:केसीआर म्हणाले- महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा यशस्वी होतोच; सुडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्व नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यामध्ये मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली रणनिती स्पष्ट केली आहे, तर केसीआर म्हणाले आम्ही पुन्हा एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.

महाराष्ट्रातून निघालेला मोर्चा यशस्वी होतोच- केसीआर

केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याचेच संकेत दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही हाच मुद्दा अधोरेखित करत एका सूडाचे राजकारण संपले पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.

केसीआर आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीनंतर केसीआर यांनी बैठकीतील मुद्यांवर भाष्य केले.

यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी म्हटले की, आज एक सुरुवात झाली आहे आणि आम्ही थेट स्पष्टपणे सांगितले. आम्ही इतर नेत्यांशीही खुलेपणाने बोलू. कशाप्रकारे तिसऱ्या आघाडीची सुरुवात होईल, याबाबत आम्ही चर्चा करु. अत्यंत वाईट पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आहेत, यात काही शंकाच नाही. मात्र, केंद्र सरकारला ही नीती बदलावी लागेल, अन्यथा त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

के. चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरेंमध्ये 'चाय पे चर्चा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचलेल्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि ठाकरे यांच्यामध्ये 'चाय पे चर्चा' झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्ष निवासस्थानी दोघांनी चहा घेत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

बैठकीत तेजस ठाकरेंची हजेरी -

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकींमध्ये नेहमी आदित्य ठाकरेंची उपस्थित असते. तेजस ठाकरे नेहमी त्यांच्या कामात गुंतलेले असतात. पण, आज आदित्य ठाकरे मुंबईत नाहीत. त्यामुळे आज तेजस ठाकरे उद्धव ठाकरे आणि केसीआर यांच्या बैठकीत दिसून आले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली का? - सोमय्या

या भेटीसाठी सोनिया गांधींची परवानगी घेण्यात आली का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिले.

राऊतांनी केला अपशब्दांचा वापर

किरीट सोमय्यांनी सवाल केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना अपशब्दांचा वापर केला. ते म्हणाले की, 'कोण आहे किरीट सोमय्या? देशात असे चु*## लोक फार आहेत. देशातील अशा प्रत्येक #** लोकांना शिवसेना, देशातील राजकारणाबाबत वारंवार प्रश्न विचारणे मीडियाला शोभत नाही. देशातील राजकारण 2024 नंतर अशा *## लोकांना संपवून टाकेल. असे लोक देशामध्ये राहणार नाहीत. देशातील राजकारण पारदर्शक असणार आहे. 10 मार्चनंतर तुम्हाला कळेल.' असे राऊत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...