आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:2002 मध्ये पहिल्यांदा अपर कट खेळला; त्यासाठी विशेष तयारी केली नव्हती : सचिन तेंडुलकर

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण सामन्यागणिक विक्रमी खेळीने माेठा यशाेशिखर गाठला आहे. मात्र, यासाठी विशेष अशी ठरवून काेणतीच खेळी केली नाही. यादरम्यान मी कधीही अपर कट खेळण्याचा सराव केला नव्हता. हा फटका खेळण्यासाठी कधी विशेष तयारी केली नव्हती, अशी प्रतिक्रीया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली. त्याने आपल्या करिअरमध्ये २००२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना पहिल्यांदा अपर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता.

सचिनने एका चाहत्याच्या अप्पर कट फटक्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर खास आपल्या शैलीमध्ये समाधानकारक असे उत्तर दिले आहे. “अपर कट मारण्याचा प्रसंग हा दक्षिण आफ्रिकेत २००२ मध्ये घडला. यादरम्यान दाैऱ्यावर असताना आम्ही ब्लोमफोंटेनमध्ये कसोटी खेळत होतो. आम्ही प्रथम फलंदाजी करत होतो आणि अँटेनी ऑफ स्टम्पजवळ शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी करत होता, जो नियमात करत होता. तो क्रीजच्या बाहेरील कोनातून गोलंदाजी करत होता, मी लाइनबाबत अंदाज लावू शकत होतो. अशा प्रकारच्या बाउंसरला खेळण्याची पद्धत होती, तुम्ही चेंडूवर गेले पाहिजे आणि त्यानंतर चेंडू तुमच्या उंचीपेक्षा अधिक चेंडू उसळी घेतो, तुम्ही खाली राहून आक्रमण करू शकता. मी असाच विचार केला की, चेंडूच्या वेगाचा वापर करत थर्ड मॅन चौकाराच्या दिशेने खेळवा,असेही त्याने या वेळी सांगितले. सचिनने म्हटले,”या फटक्याने अनेक वेगवान गोलंदाजांना अडचणीत आणले, बाउन्सर निर्धाव चेंडूसाठी टाकला जातो. मी कोणत्याही प्रकारची योजना बनवत नाही. अनेक वेळा तुम्हाला आपल्या नैसर्गिक भावनाचा विचार करावा लागतो, मी हेच केले.’