आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:यूपीएससी पूर्वप्रशिक्षण; अर्ज भरण्यासाठीची मुदत 11 मार्चपर्यंत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वतीने (एसआयएसी) संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरण्यास दि. ११ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘एसआयएसी’च्या मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, व कोल्हापूर केंद्रातून हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

अर्ज भरण्यास मुदतवाढ
दिनांक ७ मार्च २०२१ ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ११ मार्च राेजी सायं. ५.०० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना आदी माहिती http://www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे एसआयएसीने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...