आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, संपर्कातील व्यक्तींना केली कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती

ठाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिंदेंवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता यामध्ये आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिंदेंवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

एकनाथ शिंदे यांनी याविषयी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, "काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती."