आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Urfi Javed Clarified On Being Trolled In Airport Look, Said – If Publicity Was Wanted, Then I Would Have Gone To The Airport Without Clothes; News And Live Updates

ट्रोलर्सना प्रत्युत्तर:एअरपोर्ट लूकवर ट्रोल झाल्यानंतर उर्फी जावेदने दिले स्पष्टीकरण; म्हणाली - जर प्रसिद्धीचं हवी होती तर कपड्यांशिवाय एअरपोर्टवर गेली असती

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला कपड्यांवरुन काही समस्या आली नाही

अभिनेत्री उर्फी जावेद अलीकडेच तिच्या एअरपोर्ट लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. उर्फीने गेल्या आठवड्यात बिकिनी टॉपसह क्रॉप डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्सची जोडी केली होती. हे ड्रेस खूपच रिव्हीलिंग आणि बोल्ड होते, ज्यामुळे उर्फी जावेदचे एअरपोर्टवरील फोटो समोर येताच ट्रोलर्सने तीला वाईट प्रकारे ट्रोल करायला सुरुवात केली. परंतु, या ट्रोलनंतर अभिनेत्री उर्फी जावेदने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.

उर्फी जावेदने ईटाइम्सशी केलेल्या संभाषणात सांगितले की, माझ्याकडे कपड्यांपेक्षा बरेच काही आहे. लोक माझ्याबद्दल का बोलत नाहीत हे मला माहित नाही. मी काहीही पोस्ट केले तरी लोकांना नेहमी काहीतरी सांगायचे असते. मी बिकिनी किंवा सलवार सूटमध्ये असले तरी लोक माझ्या पोस्टवर वाईट कमेंट करतात अशा शब्दांत उर्फीने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.

मला कपड्यांवरुन काही समस्या आली नाही
अभिनेत्री पुढे म्हणाली की, मी लखनऊच्या एका अत्यंत पुराणमतवादी कुटुंबात मोठी झाली आहे. परंतु, मला कधीही कपड्यांवरुन काही समस्या आली नाही. मला जे आवडते ती मी परिधान करते. याबाबत लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही. मी ज्या ठिकाणी जाते तिथे मला प्रेरणा मिळते असेही उर्फीने सांगितले.

जर प्रसिद्धीचं हवी होती तर कपड्यांशिवाय एअरपोर्टवर गेली असती
ट्रोलिंगवर प्रत्युत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, सुरुवातीला यामध्ये कदाचित माझा दोष असेल असे वाटायचे. परंतु, आता तसे काही वाटत नाही. मला एअरपोर्टवर जर खरोखरच प्रसिद्धीच मिळवायची होती तर मी कपड्यांशिवाय एअरपोर्टवर गेली असती असे उर्फीने ट्रोलर्सना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...