आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझ्या पेहरावामुळे मुस्लिम मालक मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत, मी मुस्लिम आहे म्हणून हिंदू मालकही मला घर देत नाहीत. मला मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईत भाड्याने घर मिळणे अवघड झाले आहे, असे ट्विट करत उर्फी जावेद हीने आपल्याला मुंबईत घर मिळणे अवघड झाल्याचे सांगितले आहे.
मुंबईमध्ये भाड्याने घर मिळत नसल्याचा खुलासा उर्फी जावेदने केला आहे. उर्फीला घर देण्यासाठी कोणी तयार नाही. मुंबईमध्ये घर का मिळत नाही, यामागील मोठे कारण उर्फीने स्वतः सांगितले आहे. तोकड्या कपड्यांमुळे आणि मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे मुंबईमध्ये राहण्यासाठी कोणी घर देत नसल्याचे उर्फीचे म्हणणे आहे.
हे आहे कारण
उर्फी जावेद आपल्या ट्विटमध्ये म्हणाली,‘मी ज्याप्रकारचे कपडे घालते, त्यामुळे मुस्लिम घर मालक मला घर भाड्याने देत नाही. हिंदू घर मालक मी मुस्लिम असल्यामुळे मला घर देत नाहीत, तर मिळणाऱ्या राजकीय धमक्यांमुळे काही घर मालक भड्याने घर देण्यास नकार देत आहेत. मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधणे फार कठीण आहे.’मुंबईत भाड्याने अपार्टमेंट शोधणे अवघड झाले आहे.
चित्रा वाघ-उर्फी जावेद वाद
गेल्या काही दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मॉडेल उर्फी जावेद यांच्यात मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहेत. उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही. अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी उर्फीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती. उर्फी जावेदनेही महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांची तक्रार केली होती.
युजरकडून खिल्ली
मात्र आता उर्फी जावेदच्या ट्विटनंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटवर युजर्स गंमतीशीर कमेंटस करत आहेत. एक युजर कमेंट करत म्हणाला, हे चुकीचं आहे तर दुसरा युजर खंबीर राहा असे म्हणाला. अन्य एक युजरने ‘कर्म’असे म्हणत उर्फीला ट्रोल केले. सध्या सर्वत्र उर्फीच्या ट्विटची चर्चा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.