आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून वाघ यांनी उर्फीच्या अटकेची मागणी केली आहे. तिच्याविरोधात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. आपल्याविरोधात तक्रार दिल्यानंतर उर्फी जावेद हिनेही सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, ‘ही तीच महिला आहे जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी ओरडत होत्या. त्यानंतर लाच घेतल्याने त्यांचे पती निशाण्यावर आले. पतीला वाचवण्यासाठी वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय आणि चित्रा वाघ एकमेकांचे चांगले मित्र बनले. मीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आम्ही दोघी सुद्धा चांगल्या मैत्रिणी होऊ’, असा उपरोधिक टोला उर्फी हिने चित्रा वाघ यांना लगावला आहे. दरम्यान, उर्फी मुस्लिम असल्यामुळे चित्रा वाघ टार्गेट करतात का?, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही अमृता फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करून चित्रा वाघ यांना सवाल केला आहे.
उर्फी जावेदबाबत काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.