आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Urging Uddhav Thackeray To Come Along, How Many Tours Do You Do When You Are In The Cabinet? Shambhuraj Desai's Question To Aditya Thackeray

उद्धव ठाकरेंनाही सोबत येण्याचे आवाहन:मंत्रिमंडळात असताना किती दौरे केले? शंभुराज देसाईंचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मैत्री दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद द्यावे आणि एकत्र यावे असे आवाहन शंभुराज देसाई यांनी केले आहे. तसेच एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरे मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होते? असा सवाल शंभुराज देसाई यांनी उपस्थित केला आहे.

सत्ता गेली, 40 निष्ठावान आमदार एकनाथ शिंदेंसोबत एकवटले आहे. हे पाहूण आदित्य ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळे त्यांचे महाराष्ट्र भरात दौरे सुरू आहेत. किमान यामुळेतरी सर्वसामान्य माणसाला मातोश्रीचे दारे उघडली आहे, असा टोला देसाई यांनी ठाकरेंना लगावला आहे. शहरी भागातील जनतेसह ग्रामीण भागातील जनतेचा शिंदेंना मिळणारा पाठिंबा यावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करत केवळ दिल्ली दौऱ्यावर आदित्य ठाकरे बोलत आहे, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. दिल्लीत नीती आयोगाची बैठक होती यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, दिल्लीतील बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांना जावे लागते मात्र आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील दौऱ्याकडेही लक्ष द्यावे, तुमचे सरकार गेले म्हणून तुम्ही राज्यात दौरे करता आहात. तुम्ही मंत्री असताना किती दौरे केले याकडे पहिले पहा असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...