आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी 1 डिसेंबरला शिवसेनेतेत प्रवेस केला. काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर उर्मिला यांना ट्रोलर्सचा सामना कारवा लागत आहे. यादरम्यान उर्मिला यांनी एका ट्वीटद्वारे सर्व ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी सोशल मीडियावर लिहीले,'तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं... मला हे गाणे आवडते. तुमचा काय विचार आहे...' ही ओळ गोविंदा आणि करिश्मा कपूरचा चित्रपट 'कुली नंबर-1'मधील गाण्याच्या आहेत. या ट्वीटसह उर्मिला यांनी काही हसणाऱ्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.
तुमको मिर्ची लगीं तो
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) December 2, 2020
मैं क्या करूँ 😀😝😜
Love this song 😜
What do you think..😆
कंगनाने उर्मिलाला म्हटले होते-सॉफ्ट पोर्न स्टार
काही लोकांचे म्हणने आहे की, हे ट्वीट त्यांनी कंगना रनोटसाठी लिहीले आहे. कंगना रनोटने काही दिवसांपूर्वीच उर्मिला मातोंडकरवर आपल्या स्ट्रगलचा अपमान करण्याचा आरोप लावत सॉफ्ट पोर्न स्टार म्हटले होते. परंतू, याला उत्तर देताना म्हटले की, इंडस्ट्रीमध्ये त्यांनी खूप स्ट्रग केली आहे. तसेच, नेपोटिझमचा सामनाही केला आहे.
20 महिन्यात दोन पक्ष बदलले
लोकसभा निवडणुकीपूर्वी 27 मार्च 2019 ला काँग्रेसमध्ये सामील झालेल्या उर्मिला यांनी मुंबई नॉर्थ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत त्रासाला कंटाळून 10 सप्टेंबर 2019 ला पक्षातून राजीनामा दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.