आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर:देशाच्या आर्थिक राजधानीतून करतील रोड शोची सुरुवात, उद्योगपतींची घेणार विशेष भेट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. योगी आदित्यनाथ आज देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई येथून देशांतर्गत रोड शोची सुरुवात करतील

उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी योगी आदित्यनाथ यांचा हा मुंबई दौरा आयोजित कऱण्यात आला आहे. मात्र योगी आदित्यनाथ विरोधकांच्या चांगलेच निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर संजय राऊत आणि अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले आहे.

फिल्मसिटीबाबत चर्चा

योगी आदित्यनाथ यांना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारचीही विशेष भेट घेतली. योगींनी उत्तर प्रदेशातल्या फिल्मसिटीबाबत अक्षयशी विशेष चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

या उद्योगपतींची घेणार भेट

योगी आदित्यनाथ आपल्या या दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते विविध उद्योगपतींसोबत वन टू वन बैठक घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...