आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकल प्रवास:​​​​​​​लसीकरण झालेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा विचार करावा, उच्च न्यायालयाच्या ठाकरे सरकारला सूचना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरत चालली आहे. दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पूर्णपणे निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुंबईची लाइफलाइन लोकल देखील बंद आहे. यामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केलेल्या लोकांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. आता उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला याविषयी सूचना दिल्या असल्याची माहिती आहे.

याविषयी उच्च न्यायालयाने म्हटले की, 'लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का दिली जात नाही. लसीकरण झालेल्या नागरिकांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. सरकारने लसीकरण झालेल्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत विचार करावा' अशा सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत.

उच्च न्यायालयात वकिलांना प्रवासाची परवानगी देण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. या दरम्यान हायकोर्टाने ही सूचना केली आहे. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी सर्वसामान्यांना प्रवास देण्यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. वकिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्याच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. वकिलांच्या संघटनेकडून ही याचिका करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...