आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नवे वर्ष आणि गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर कोविड संदर्भातले सर्व निर्बंध उठवले. या उठवलेल्या निर्बंधामुळे राज्यात आनंदाचे वातावरण आहे. यात एक म्हणजे मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने कोविड निर्बंध हटवतांना रेल्वे संदर्भातही एक मोठी अपडेट दिली आहे. रेल्वेने लसीकरणाशी संबंधित पर्याय तिकीट अॅपमधून हटवला आहे.
कोविडसंदर्भातल्या निर्बंधामुळे केवळ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची आतापर्यंत मुभा होती. मात्र आता राज्य सरकारने निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचे प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही असे सांगण्यात आले आहे. यामुळे मुंबईतल्या रेल्वेसाठी काऊंटरवर आणि अॅपवर सर्वांकरिता तिकिट सुविधा सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातल्या सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या असल्याचे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
तसेच कोविड काळात सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर बंद केले होते ते उघडण्यात येतील. याशिवाय फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीन आता उघडल्या जाणार असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यानं दिली आहे.
कोरोना महामारीत रेल्वेचे तब्बल 1000 कोटींचे नुकसान
राज्य सरकारने कोविडचे सर्व निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महामारीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागला. मात्र याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वेला त्यांच्या महसुलात जवळपास 1000 कोटींचा तोटा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.