आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता हाेणार लसटंचाई:लस मिळणेही दुरापास्त,18 ते 45 वयोगटातील लसीकरण रखडण्याची चिन्हे

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्राने १८ वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस घेण्यास संमती दिली खरी, पण १ मेपासून प्रारंभ करावयाची १८ ते ४५ वयोगटासाठी लस आणायची कोठून, असा मोठा पेच राज्य सरकारसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे १ मेपासूनची लस मोहीम रखडणार अशी शक्यता आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करत आहे, तर १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा भार राज्याने उचलायचा आहे. १ मेपासून १८ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. मात्र २४ मेपर्यंत आपण फक्त केंद्र सरकारला लस पुरवू शकतो. तसा करार झाला आहे. त्यामुळे राज्याला इतक्यात लस देऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले.

१८ ते ४५ वयोगाटातील राज्यात ८ कोटी ५० लाख लस लाभार्थी आहेत. राज्याचा विकास निधी लसीकरणासाठी वळवू, पण तीन महिन्यांत ६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनोदय आहे. त्यामुळे जनतेत प्रतिरोध क्षमता (हर्ड इम्युनिटी) तयार होईल आणि कोरोना संकटाची तीव्रता कमी होईल, असा त्यामागे विचार आहे. मात्र राज्याला लस मिळणे दुरापास्त झाले आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन अद्याप मोठ्या प्रमाणात होत नाही.

परदेशी लसींना केंद्राने मंजुरी दिली आहे. आयात शुल्क काढून टाकला आहे. मात्र राज्यांना खरेदीची अद्याप मुभा नाही. त्यामुळे सार्वत्रिक लसीकरणात आघाडी घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मनोदय थंड बस्त्यात जाणार आहे. मात्र १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अद्याप केंद्राच्या सूचना राज्याला प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...