आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुहूर्तापुरतेच लसीकरण!:राज्यात आज 18+ लोकांचे लसीकरण, डोस कमी, पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे निर्णय : टोपे

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाटेल ती किंमत मोजून १२ कोटी डोस खरेदीची तयारी

लसीचे पुरेसे डोस नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण १ मेपासून शक्य नाही, असे जाहीर करणाऱ्या राज्यातील ठाकरे सरकारने लसीकरणासाठी महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधला आहे. मात्र आज केवळ उद्घाटनापुरते लसीकरण होईल. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र लस उपलब्ध नसल्याने किमान १५ मेपर्यंत लसीकरण मोहीम सुरू होणार नाही, असे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले हाेते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला.

वाटेल ती किंमत मोजून १२ कोटी डोस खरेदीची तयारी
लस खरेदीसाठी कोणतीही किंमत मोजण्याची राज्याची तयारी आहे, अशी ग्वाही देत लस केंद्रावर गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जनतेला केले. ‘रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही, असे वचन त्यांनी नागरिकांना दिले.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त न चुकवण्याचा सीएमचा आग्रह
मुख्यमंत्र्यांनी बैठकीत लसीकरणासाठी १ मेचा मुहूर्त चुकता कामा नये, भले मोहीम विलंबाने का होईना, अशा सूचना दिल्या. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘केवळ मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे आपण १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाचे किरकोळ लसीकरण करण्याचे ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक-दोन केंद्रांवरच लस टोचली जाईल.’

मुख्यमंत्री म्हणाले, लाॅकडाऊन केले नसते तर रुग्णसंख्या १० लाखांवर गेली असती. राज्यात २७५ आॅक्सिजन प्लँट लावले जात आहेत. ब्रिटनप्रमाणे राज्यात नागरिकांचे सार्वत्रिक लसीकरण केले जाईल. प्रत्येक राज्याला कोविनप्रमाणे स्वतंत्र अॅप तयार करू द्यावे. भारत बायोटेक व सीरम इन्स्टिट्यूट या कंपन्या मेमध्ये १८ लाख डोस पुरवतील.

बातम्या आणखी आहेत...