आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस लसीकरण:मुंबईत 2,053 जणांचे झाले बोगस लसीकरण; राज्य सरकारची हायकोर्टात कबुली, आतापर्यंत ४ गुन्हे दाखल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार सपशेल फेल : कोर्ट

मुंबईत बोगस लसीकरण शिबिरांत २,०५३ पेक्षा जास्त लोकांना लस टोचण्यात आली आहे. असे ९ कॅम्प आयोजित झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात दिली. राज्य सरकारचे वकील दीपक ठाकरे यांनी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता व न्या. जी. एस. कुलकर्णी यांच्या पीठासमोर स्थिती अहवाल सादर केला.

ठाकरे म्हणाले, पाेलिसांनी आतापर्यंत ४०० साक्षीदारांचे जबाब नाेंदवले आहेत. कांदिवलीतील एका गृहनिर्माण संस्थेत बनावट कॅम्प घेतल्याप्रकरणी एका डॉक्टरचा शोध सुरू आहे. काही आरोपींची ओळख पटली आहे.

त्यांना नेमके काय टोचले?
अहवाल मंजूर करत हायकाेर्ट म्हणाले, ‘बोगस लसीकरण पीडितांवर कोणत्याही प्रकारच्या साइड इफेक्ट्सची तपासणी केली जावी. ज्यांनी ही लस घेतली त्यांना नेमके काय टोचण्यात आले होते, बनावट लसीचा परिणाम काय होऊ शकतो, हीच आमची सर्वात मोठी चिंता आहे.’

सरकार सपशेल फेल : कोर्ट
राज्य सरकार खासगी गृहनिर्माण संस्था, सोसायट्यांत लसीकरण शिबिरांबाबत दिशानिर्देश ठरवू न शकल्याबद्दल कोर्टाने चांगलाच अाक्षेप घेतला. विशेष म्हणजे कोर्टाने याबाबत जूनच्या सुरुवातीलाच राज्य सरकारला आदेश दिला होता.

बातम्या आणखी आहेत...