आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Vaccination Updates: Center Approves Covacin Vaccine Production In Halfkin; 12 Crore Doses Possible Throughout The Year; News And Live Updates

‘कोव्हॅक्सिन’:हाफकिनमध्ये ‘कोव्हॅक्सिन’ लस निर्मितीस केंद्राची मंजुरी; वर्षभरात 12 कोटी डोस शक्य

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचे आभार

भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व निर्धारित एक वर्षाच्या आत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून ‘कोव्हॅक्सिन बनवण्यास १ वर्षाचा कालावधी दिला आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार आहे. त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरू करण्याचे नियोजन केले आहे. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १२ कोटी ६० लाख लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...