आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षणात खुलासा:कोरोना व्हायरसविरूद्ध लसच सर्वात प्रभावी शस्त्र, मुंबईत दुसर्‍या डोसनंतर केवळ 26 जण पॉझिटिव्ह

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत 10 लाख लोकांना दोन्ही डोस

कोरोना व्हायरसवर लसच एकमेव प्रभावी शस्त्र असल्याचे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात लसीकरणावर सर्वात जास्त जोर दिला जात आहे. याची प्रचिती मुंबई आली असून दुसऱ्या डोसनंतर केवळ 26 जण कोरोनाबाधीत झाले असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने 1 जानेवारी ते 17 जूनदरम्यान सुमारे 3 लाख कोरोनाबाधीतांचा सर्वे केला. दरम्यान, यात लसींचा दुसरा डोसच नव्हे तर पहिला डोस ही अधिक चांगले कार्य करत असल्याचे दिसून आले आहे.

सर्वेक्षणानुसार, 2.9 लाख लोकांमधून 26 लोक दुसरा डोस घेतल्यानंतर तर 10 हजार 500 लोक पहिला डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले. मुंबईत 1 जानेवारी ते 17 जूनदरम्यान सुमारे 44 लाख 94 हजार 123 लोकांनी कोरोनाची पहिली लस घेतली होती. विशेष म्हणजे यातील केवळ 0.23 टक्के कोरोनाबाधीत झाले होते.

सर्वेक्षणात होम आयसोलेशनचे जास्त रुग्ण
महानगर पालिकेच्या वॉर रुमच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 3.95 लाख नवीन रुग्ण आढळले आले. परंतु, महानगर पालिकेने यातील 2.9 लाख कोरोनाबाधीतांचा सर्वे केला असून यातील जास्तीत जास्त रुग्ण होम आयसोलेशनमधील आहे. तर बाकीचे रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याने त्यांची अद्याप एंट्री झालेली नसल्याचे बीएमसीने सांगितले आहे.

मुंबईत 10 लाख लोकांना दोन्ही डोस
राज्यात गेल्या काही दिवसापासून 18 ते 45 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु आहे. सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आतापर्यंत 53.83 लाख लोकांचे लसीकरण झाले असून यातील 10 लाख लोकांना कोरोना लसींचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.

बीएमसी करणार पाचवा सीरो सर्वेक्षण
कोरोना महामारीची तिसरी लाट लक्षात घेता बीएमसी मुंबई शहरात पाचवा सीरो सर्वेक्षण राबवणार आहे. यामध्ये मुंबईतील 24 वार्डाचा समावेश असून हे सर्वे 18 वर्षांवरील लोकांसाठी असणार आहे. यातून बीएमसीला किती लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित झाली हे पाहायचे आहे. यासाठी 4 हजार लोकांचे नमुने घेतले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...