आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचे मंत्रिपद 2 महिन्यात जाणार:आमदार वैभव नाईक यांचे भाकीत; म्हणाले - भाजपला आता राणेंची राजकीयदृष्टया गरज नाही

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असा गौप्यस्फोट कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरविणाऱ्या राणेंच राजकीय अस्तित्व आता भाजप ठरविणार असल्याचे म्हणतानाच भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही, त्यामुळे राणेंना राजीनामा द्यावा लागणार असल्याचे भाकीत कुडाळ मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत आसताना केले.

नितेश राणेंवर टीका

वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावे की त्यांना इडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसचे काय झाले. वडिलांनी नेमका कोणता समझोता केला ? हे अगोदर जनतेसमोर आणावे आणि मग इतरांना उपदेश करावा.

यापूर्वीही ही राणेंसह सरकारवर टीका

वैभव नाईक यांनी याआधी देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करताना भाजपचा मेळावा हा नारायण राणेंना राजकीय निरोप देण्यासाठी घेण्यात आला आहे. तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारवर टीका करताना रहिवाशांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत वैभव नाईक यांची शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नागरिकांना त्रास देऊन माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकारच्या मध्यमातून ACB करत आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...