आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Valentine Day 2022 | Amruta Fadanvis Valentine Day Post | Marathi News | 'You Are In The Heart ... You Are In The Soul' Photo And Tweet Of Amrita Fadnavis On Valentine's Day

Valentine Day 2022:'तूच हृदयात... तूच आत्म्यात' व्हॅलेंटाईन दिनी अमृता फडणवीस यांचा फोटो आणि ट्विट चर्चेत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हणून ओळखले जाते. आजच्या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांसोबत प्रेम व्यक्त करतात. या दिवसाचे औचित्य साधत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. मिसेस फडणवीस यांचे हे ट्विट सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमृता फडणवीस या एक चांगल्या गायिका देखील आहेत. त्यांनी आज खास दिवशी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी आपल्या संगीत आणि गायनावरील प्रेमाचा उल्लेख केला आहे.

ट्विटमध्ये काय?

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून स्वतःचा पार्वतीच्या रूपातला एक फोटो शेअर केला आहे. तसेच नवे गाणे हे भगवान शंकरासाठी आणले जात असल्याचे देखील त्यांनी पोस्टमधून स्पष्ट केले आहे. लॉर्ड शिवा म्हणजेच महादेवाच्या भक्तीवर आधारीत हे गाणे आहे. पोस्टमध्ये अमृता फडणवीस यांनी शेअर केलेला फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. भगव्या वस्त्रांमध्ये गळ्यात रुद्राक्षांची माळ घालून आणि हातात त्रिशुळधारी घेतलेल्या अमृता फडणवीस दिसत आहेत.

"मी तुला निवडते आहे आता आणि कायमचे. माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात, श्वासात तू आहेस. हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो.. मी माझ्या रूद्र, लॉर्ड शिवाला म्हणजेज भगवान शंकराला माझी संगीतमय स्तुती अर्पण करत आहे." असे ट्विटच्या माध्यमातून अमृता फडणवीस म्हणाल्या. सध्या अमृता फडणवीस यांच्या या लुकची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

अमृता फडणवीस नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. अनेक जण तर त्यांच्या ट्विटची देखील आतुर्तेन वाट पाहत असतात. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या ट्रॅफिकवर त्यांनी विधान केले होते. मुंबईच्या ट्रॅफिकमुळे लोकांचे घटस्फोट होतात. असे अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा देशभरात झाली होती.

हा जावईशोध कोणी लावला?

मुंबईत 3 टक्के घटस्फोट हे ट्रॅफिकमुळे होत असल्याचा दावाच अमृता फडणवीस यांनी केला होता. त्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केली होती. अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे. त्या दरवेळी ऐकावे ते नवलच अशाप्रकारचे बोलत असतात. आता तर त्यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर हसावे की रडावे असा प्रश्न मुंबईकरांना पडला असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...