आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राला मिळणार पहिली वंदे भारत ट्रेन:मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात; 15 ऑगस्टपर्यंत 2 गाड्या मिळण्याची शक्यता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राला पहिली 'वंदे भारत ट्रेन' मिळणार असून, याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासात होणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत 2 गाड्या महाराष्ट्राला मिळू शकतात. सध्या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनमधून प्रवास केला तर आपल्याला मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन ते साडेतीन तास लागतात. पण वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यावर हा प्रवास अडीच तासावर येणार आहे, म्हणजेच प्रवाशांचा एक तास वाचणार आहे.

रेल्वेने निविदा काढल्या

भारतीय रेल्वेने निविदा जारी करून लवकरच 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याची तयारी करत असल्याचे सांगितले आहे. या निविदेत ट्रेनचे डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्सचे नियोजनही सांगण्यात आले आहे. रेल्वेने निविदा काढली असून लवकरच ट्रेनचे अपग्रेडेशन केले जाईल असे सांगितले आहे. सध्या या ट्रेनच्या अपग्रेडेशनचे काम महाराष्ट्रातील लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीत केले जात आहे. यानंतर हे काम चेन्नईतही केले जात आहे.

वंदे भारत लांब पल्ल्याची योजना

ही ट्रेन आता मध्यम आणि लांब पल्ल्यांसाठी चालवली जाईल, असे रेल्वेचे नियोजन आहे. ट्रेनमध्ये अप स्लीपर कोच देखील असतील, जेणेकरून लोकांना लांबचा प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेने या संदर्भात एक निविदा जारी केली आहे, ज्याची अंतिम तारीख 26 जुलै 2022 आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ताशी 160 किलोमीटर वेगाने धावेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट, सेकंड एसी आणि थर्ड एसी सुविधा उपलब्ध असतील. या ट्रेनमध्ये एकूण 16 डबे बसवण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...