आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम’:सरकारी कार्यालयांमध्ये आजपासून अभियानाला सुरुवात, सक्ती नाही

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आजपासून राज्यभरातील सरकारी कार्यालयांमध्ये 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' या अभियानाला सुरुवात होणार आहे. अभियानानुसार, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता फोन, मोबाईलवर तसेच बैठकीत संवाद साधताना 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे लागणार आहे.

सक्ती नाही

याबाबतचा शासन निर्णयही सरकारने जारी केला आहे. मात्र, वंदे मातरम बोलण्याची सक्ती नसेल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. आज या अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
'हॅलो' हा आपुलकी न जागवणारा शब्द

शासनाने या अभियानात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शासकीय कार्यालयात दूरध्वनी अथवा परस्परभेटीत संवाद साधताना कोणत्या शब्दाने अभिवादन करायचे याबाबत स्पष्टता नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना ‘हॅलो’ हा कोणताही विशिष्ट अर्थ नसलेला आणि संभाषणकर्त्यांमध्ये कोणतीही आपुलकी न जागवणारा केवळ एक अभिवादन करणारा शब्द आहे.

शाळा, महाविद्यालयांमध्येही अभियान

सरकारने परिपत्रकात सूचना केल्या आहेत की, शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन साहाय्यित, अनुदानित, अर्थसाहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये तसेच शासन अंगीकृत सर्व कार्यालयांतही दूरध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला ‘वंदे मातरम’ असे संबोधन करावे. तसेच त्यांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरही संवाद साधताना 'वंदे मातरम', असे संबोधन करावे. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे. त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...