आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यटन विभाग आणि इंडियन ऑइल यांच्या वतीने महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव मल्टिमीडिया लाइट अॅण्ड शोच्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांना आमंत्रित करण्यात येणार अाहे, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री लोढा म्हणाले, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा मल्टिमिडीया लाइट अॅण्ड साऊंड शो २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे रात्री ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उदघाटन होईल. सर्व क्षेत्रांत योगदान दिलेल्या राज्यातील महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टिमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा महिला आणि बालविकास विभागामार्फत सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरात महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छतागृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी ठरला तर इतर महानगरांतही तो राबवण्यात येईल. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी. एन. दास, पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्वला दांडेकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.