आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:...‘वर्षा’ला ओहोटी, तर ‘सागर’ला भरती!

दीप्ती राऊत | मुंबई2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी एक किमीच्या अंतरावरील ‘वर्षा’ला ओहोटी, तर ‘सागर’वर भरती आली होती. सत्तेचे व सध्या सत्तांतराचे केंद्र दक्षिण मुंबईतील मलबार हिलवर या २ बंगल्यांमध्ये परस्परविरोधी चित्र दिसत होत. दिवसभर मुख्यमंत्री उद्धव यांच्या ‘वर्षा' निवासस्थानी निवडक पदाधिकारी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर' निवासस्थानी भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी होत होती.

शिवसेनेचे विधिमंडळ प्रतोद सुनील प्रभूंनी वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली. मात्र केवळ ५ आमदार हजर होते. उपस्थित आदित्य ठाकरे, संजय राऊत, नीलम गोऱ्हे, कैलास पाटील, अजय चौधरी, सुनील प्रभू, वैभव नाईक व उदय सामंत यांच्या चेहऱ्यावरचा प्रचंड ताण लपत नव्हता. यामुळे बैठक रद्द करून ती गुरुवारी ११.३० वाजता बोलावली आहे. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मात्र गुवाहाटीत संख्याबळ वाढत असल्याचा आनंद व्यक्त करण्यात येत होता. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील ३ आमदारांसह पोहोचल्याचा निरोप घेऊन भाजपचे नेते गिरीश महाजन आले होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माधुरी मिसाळ अशी भेटायला येणाऱ्यांची गर्दी वाढत होती.

बातम्या आणखी आहेत...