आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Varsha Raut Ed Summons Today | Varsah Raut Ed Office | Summons To Appear Today At 11 Am In The Case Of Mail Scam And Land Purchase In Alibaug

मिसेस राऊतांची आज ईडी चौकशी:वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर; ​​​​​​​पत्राचाळ घोटाळाप्रकरणी समन्स, थोड्याच वेळात चौकशीला सुरुवात

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर वर्षा राऊत ईडी कार्यालयात पोहोचलेल्या आहेत. गोरेगावमधील पत्राचाळप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी चौकशीसाठी हे समन्स बजावले आहे. पत्राचाळ घोटाळा तसेच अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणातील व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले असल्याचा आरोप ईडीने केला आहे.

जमीन खरेदीची काही कागदपत्रे ईडीने कोर्टात सादर केली आहेत. राऊत यांच्या नावावर काही अनोळखी लोकांची पैसे पाठवल्याचा दावा देखील ईडीने केला आहे. त्यानुसार आता याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराची देखील चौकशी होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांची याआधीही पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी केली होती.

राऊतांना कोठडी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या पत्नींच्या अडचणीत देखील वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. आठ ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. खात्यात कोटयावधी रुपये आले कसे? या मागचा सूत्रधार कोण आहे याचा ईडी तपास करणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

राऊतांचे कोठडीतून पत्र

दरम्यान, संजय राऊत यांना न्यायालयाने आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राऊत सध्या कोठडीत असून, त्यांनी एक पत्र लिहले आहे. "बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसैनिकांनी रडायचे नाही, सत्यासाठी लढायचे. त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे", असे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मित्रपक्षांना लिहिले आहे. संकटकाळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि शुभचिंतक कोण आहेत, हे कळते. भाजप आणि केंद्र सरकारने आपल्याविरोधात राजकीय सूडाचे नाट्य रचले आहे. मात्र, भाजपच्या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही. ईडीच्या चौकशीमुळे शिवसेना नमते घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढणार असून कितीही दबाव आला तरी भीक घालणार नाही, असे राऊतांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात राऊतांनी शिवसेनेला मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट झाले. त्यांनी म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने 9 विकासकांना 901 कोटी रुपयांना एफएसआय विकला.

पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3 हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरुंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली 138 कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

सदर प्रकारणामध्ये आपण संजय राऊत यांची कोठडी मिळाल्यानंतर ईडीने केलेल्या तपासात वर्षा राऊत यांचे नाव देखील समोर आले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत. खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले. या कथित घोटाळ्यात वर्षा राऊत यांची नेमकी भूमिका काय सगळ्याचीच ईडी चौकशी करणार आहे

बातम्या आणखी आहेत...