आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळ:वर्षा राउतांची आज ईडीसमोर हजेरी, अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणातील व्यवहार

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत शनिवारी गोरेगावमधील पत्राचाळप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. पत्राचाळ घोटाळा तसेच अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणातील व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत, असा ईडीचा आरोप आहे.

तशी कागदपत्रेही ईडीने कोर्टात सादर केली आहेत. आता त्यांच्या नावावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांची याआधीही पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी केली होती.

बातम्या आणखी आहेत...