आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विद्यापीठांच्या परीक्षा:सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय? सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार की कोरोना संपणार? युवासेनेच्या वरुण सरदेसाईंचा UGC ला सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असतानाच घ्यायला हव्या होत्या

राज्य सरकारकडून अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत.  हा राज्य सरकारला मोठा धक्का आहे. यानंतर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी एचआरडीकडे धाव घेतली आहे. 

सरदेसाई म्हणाले की, 'सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे लॉजिक काय?. सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार आहे की कोरोना संपणार आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. यासोबतच परीक्षा घ्यायच्याच होत्या तर मग कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असतानाच घ्यायला हव्या होत्या भूमिकाही त्यांनी घेतली. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. 

वरुण सरदेसाई यांनी कम्युनिटी ट्रान्समिशनची चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'यूजीसीने सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेतल्या, या परीक्षादरम्यान कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी केला आहे. 

0