आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात मनसेचे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावेळी रुपेशकडे 30 लाख रुपयांची खंडणीदेखील मागण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
नक्की काय झाले होते?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत उर्फ तात्या मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह प्रमाणपत्र एका तरुणीने बनवले. त्यानंतर 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जर खंडणी दिली नाही तर गोळ्या घालण्याचीही धमकी मोरे यांच्या मुलास देण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या धमकी प्रकरणामुळे पुण्यात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
पोलिसांचे मानले आभार
पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. आणखी काही जणांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियामून पोलिसांचे आभार मानले आहेत.
''सदरक्षणाय खलनिग्रहणाय्...कानून के हाथ बहुत लंबे होते है! धन्यवाद...भारती विद्यापीठ पोलीस,' अशी फेसबुक पोस्ट मोरे यांनी लिहिली आहे.
सावध रहा अन्यथा..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत मोरे यांनी मागील वर्षी जून महिन्यात कात्रज भागात एका मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याची बरीच जबाबदारी रुपेश यांच्या खांद्यावर होती. या मेळाव्यादरम्यान रुपेश यांनी त्यांची कार थोरवे शाळेच्या वाहनतळात उभी केली होती. तेव्हा एकाने त्यांच्या गाडीवर एक चिठ्ठी लिहून ठेवली. रुपेश हे परत गाडीवर आल्यावर त्यांना त्यांच्या गाडीवर एक कागद दिसला. त्यांनी तो वाचला असता त्यात, ‘सावध रहा रुपेश, अन्यथा...' असा धमकीवजा मजकूर लिहिलेला आढळला होता. याप्रकरणी देखील वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संबंधित वृत्त
खंडणी द्या अन्यथा गोळ्या झाडू:मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलास मागितले 30 लाख रुपये, अन्यथा जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत उर्फ तात्या मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह प्रमाणपत्र एका तरुणीने बनवले. त्यानंतर 30 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.