आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस यांच्या कामांवर संघ परिवाराची नजर:वझे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी पदावर नियुक्ती, युपी पॅटर्न राज्यातही

विनोद यादव I मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न करून भाजपच्या हायकमांडने आधी त्यांची राजकीय उंची कमी केली आणि आता संघ परिवाराशी संबंधित चंद्रशेखर वझे (अतुल वझे) यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे! मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे दावे फेटाळून लावत सरकार आणि पक्ष यांच्यात समन्वय साधण्यासाठी वझे यांची ओएसडी पदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले.

संघ सरकारातील समन्वय गरजेचा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे कार्यकर्ते, संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषद यांच्याशी संबंधित बडे नेते आणि सरकार यांच्यात समन्वय असणे गरजेचे झाले आहे. अतुल वझे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरुन भाजप कार्यकर्त्यांच्या आणि त्याच्याशी संलग्न संघटनांच्या लोकांच्या भावना समजून घेऊन त्यांचे काम करावे.

आज कारभार स्वीकारणार

येत्या एक-दोन दिवसांत वाजे ओएसडी पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र भाजपमध्ये आतापर्यंत अतुल वझे सरचिटणीस (संघटन) पदाची जबाबदारी सांभाळत होते. ह्या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निधी कामदार यांना सीएमओमध्ये ओएसडी म्हणून ठेवण्यात आले होते. कामदार हे देखील संघ परिवाराच्या पार्श्‍वभूमीचे असून आजही ते उपमुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त आहेत.

महिन्याला लाखो रुपये पगार मिळेल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात संघ परिवाराच्या पार्श्वभूमीतून ओएसडी म्हणून नियुक्त झालेले चंद्रशेखर वझे आणि निधी कामदार यांना दरमहा 1.23 लाख ते 2.16 लाख रुपये वेतन मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन आदेशावरून या प्रकाराची माहिती प्राप्त झाली आहे.

महाराष्ट्रात यूपी पॅटर्नचा वापर

यूपीमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी संघ परिवारातील सुनील बन्सल यांना संघटनेचे महामंत्री करण्यात आले होते. मात्र, त्यांची सीएमओमध्ये ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली नाही.असे असूनही बन्सल यांची गणना राज्यातील प्रभावशाली नेत्यांमध्ये होत राहिली. कारण बन्सल यांनी 2017 च्या यूपी विधानसभा, 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जबरदस्त विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता यूपी पॅटर्नचा काही भाग राज्य भाजपकडून महाराष्ट्रात राबवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...