आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद बातमी:ज्येष्ठ साम्यवादी नेत्या रोझा देशपांडे यांचे निधन, वयाच्या 92  व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोझा देशपांडे या माजी खासदार होत्या. त्यांनी पाचव्या लोकसभेमध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास दादर येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालावली. त्या 92 वर्षांच्या होत्या. कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.

रोझा देशपांडे या माजी खासदार होत्या. त्यांनी पाचव्या लोकसभेमध्ये मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासोबतच त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्येही कार्यरत होत्या. यासोबतच त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले आहे. रोझा देशपांडे या सिद्धहस्त लेखिकाही होत्या. त्यांनी लिहिलेलं 'एस. ए. डांगे : एक इतिहास' हे पुस्तक विशेष गाजलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून रोझा देशपांडे या वृद्धापकाळामुळे आजारी होत्या. यामुळे त्यांना दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्या घरी परतल्या होत्या दरम्यान आज दुपारी त्यांची प्रकृती खालावली आणि दुपारी साडे बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

बातम्या आणखी आहेत...