आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Veteran Theater Critic, Writer, Director Kamlakar Nadkarni Passed Away In Mumbai; Tributes Paid By The Chief Minister

मराठी नाट्यक्षेत्राची मोठी हानी:ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे मुंबईत निधन झाले. शनिवारी रात्री 10 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते मृत्युसमयी 88 वर्षांचे होते.उद्या सकाळी 11 वाजता त्यांची राहत्या घरावरून अंत्ययात्रा निघेल, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

एखाद्या कामगार पुढा-यांच्या भाषणाप्रमाणे त्यांची नाट्य समिक्षा होती असे, नाट्यक्षेत्रासह संपुर्ण महाराष्ट्राच्या वृत्तपत्रीय क्षेत्रात म्हंटले जायचे. आपल्या धारदार लेखनीच्या जोरावर त्यांनी नाट्य समिक्षा वाचकाचा एक नेहमीचा हक्काचा वेगळा वाचक निर्माँण केला होता.यामुळेच नाट्य क्षेत्रात त्यांची जाबाबदार नाट्य समिक्षाची ओळख तयार झाली होती.

तसेच अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार, लेखक विजय तेंडुलकर व कानेटकर यांच्या नाटकांची सुद्धा प्रखर समिक्षा केलेली होती. आपल्या शिस्तप्रिय लेखनामुळे आणि कितीही मोठा व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, नट असला तरिही त्यांची योग्य समिक्षा केल्यामुळे कमलाकर नाडकर्णी यांच्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली
नाटक क्षेत्रातील समीक्षेला वृत्तपत्रीय प्रतिष्ठा आणि न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने नाट्य समीक्षा क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना, अशी शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...