आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा सहावा:विधान परिषदेसाठी सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा; चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या रिंगणात भाजपने सहावा खेळाडू उतरून निवडणुकीत रंगत आणलीय. खरे तर पक्षाने पाच उमेदवार घोषित केलेत. त्यातल्या चार अधिकृत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बुधवारी भरण्यात आले असून, पाचव्या जागेसाठी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज आज भरला गेला. तर सहाव्या जागेसाठी भाजपने शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना पाठिंबा दिलाय. सदाभाऊ यांनी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे.

पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. उमा खापरे आणि सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

मविआचे आमदारही मत देतील

पाटील म्हणाले की, सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांमधले एक लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचारी संपामध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. शेतकरी तसेच अनेक मुद्यावर ते आवाज उठवत असतात. त्यांना आमदार मतदान करतील. भाजपचे पाच आणि अपक्ष एक असे सर्व सहा उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीतील आमदार देखील सदाभाऊंना मत देतील, असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे.

विजयासाठी हवी 27 मते

  • विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर 10 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप 4, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी 2 असे एकूण 10 आमदार निवडले जाऊ शकतात.
  • भाजपचे 106, आघाडीचे 152, अपक्ष 13 आणि छोटे पक्ष 16 असे 287 आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी 27 मते आवश्यक आहेत.
  • मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने 5 वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.

भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर

भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड

शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी

काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर

बातम्या आणखी आहेत...