आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता भाजपचीच उलटतपासणी:भाजपने ट्विट केलेल्या पवारांच्या सभेच्या व्हिडिओची तपासणी होणार- गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मागील एका सभेचा संदर्भ देत व्हिडिओ ट्विट करुन त्यांचा नास्तिक असा उल्लेख भाजप मिडिया सेलने केला. या व्हिडिओतील अर्धवट मजकूरावरच शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आता याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी भाजपचा समाचार घेणार असून या व्हिडिओची तपासणीच गृहविभागाकडून होणार आहे.

भाजपने ट्विट केलेला व्हिडिओ आणि त्यातील मजकूर राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून व्हिडिओची तपासणी केली जाणार आहे. गृहमंत्री राष्ट्रवादीचेच असल्याने आता त्यांच्या पावित्र्यामुळे भाजप-विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आणखी पेटणार असल्याची चिन्हे आहेत.

व्हिडिओ वेगळा, आरोप वेगळे

भाजपच्या अधिकृत ट्विटर पेजवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये शरद पवार यांच्याविरोधात मजकूर असून त्यांचा मागील सभेचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे. भाजपची टीका आणि प्रत्यक्षात व्हि़डिओचा सुर वेगळाच असल्याने आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे.

काय आहे भाजपने केलेले ट्विट

''नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा'' असा मजकूर या ट्विटमध्ये आहे.

व्हिडिओची तपासणी होणार

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपने ट्विट केलेल्या व्हिडिओची तपासणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओतील शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली असून भाजपकडून त्यांच्या भूमिकेचा विपर्यास काढण्यात आला अशी टीकाही सोशल माध्यमांवर झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...