आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:मुख्यमंत्र्यांसह 9 नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय शक्य

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (दि. १८) दुपारी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांसह विधान परिषदेवर निवड झालेल्या ९ आमदारांचा शपथविधी सोमवारी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होत आहे. त्यानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत नियोजनानुसार २२ जूनपासून मुंबईत होणाऱ्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनावर निर्णय घेतला जाणार आहे.

दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान भवनात आगमन होईल. १ वाजता मध्यवर्ती सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. १.४५ वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची ( विधानसभा आणि विधान परिषद) बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिवेशन नियोजित तारखेप्रमाणे घ्यायचे की काही काळ पुढे ढकलायचे याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...