आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेची हायव्होल्टेज लढत:प्रसाद लाड यांच्यासाठी फडणवीसांची शक्ती पणाला; पण भाई जगतापांचे तगडे आव्हान

मुंबई | मयुर वेरुळकर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून करण्यात आला. मात्र त्याला यश आले नाही. यामुळे पुन्हा एकदा विधानसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवारा रिंगणात आहे. पुन्हा एकदा भाजपचे नेते प्रसाद लाड आणि काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप हे विधान परिषदेसाठी आमने - सामने पहायला मिळत आहेत. 2015 च्या मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांना अवघ्या 2 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाई जगताप यांना पाठिंबा दिला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोघांकडेही हक्काचे मतदार नाही, यामुळे या निवडणुकीत चुरस पाहायला मिळते आहे. 27 मतांचा असलेला कोटा ना प्रसाद लाड यांच्यासाठी भाजपकडे आहे. ना भाई जगताप यांच्यासाठी काँग्रेसकडे दिसून येतो. यात सर्व मदार ही अपक्ष आमदारांवर आहे. मात्र लाड आणि जगताप दोन्ही उमेदवारांची आर्थिक बाजू सक्षम असल्याने यात नेमका कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय झाले 2015 मध्ये?

मुंबईतून 2015मध्ये शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. प्रसाद लाड यांचा अवघ्या दोन मतांनी निसटता पराभव झाला. त्यांना 56 मते मिळाली होती. तर रामदास कदम यांना 85 मते मिळाली तर, भाई जगताप यांना 58 मते मिळाली. मुंबई महापालिकेत शिवसेनेच सर्वाधिक नगरसेवक असल्याने रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जात होता. खरी चुरस दुसऱ्या जागेसाठी होती. पडद्यापाठून भाजपने मदतीचा हात दिल्यामुळे प्रसाद लाड यांनी 56 मतांपर्यंत मजल मारली खरी मात्र त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. अशीच काहीशी परिसथिती आता आहे. आणि यामुळेच काँग्रेसचे भाई जगताप यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.

उमेदवारांना 26 मतांची गरज

राज्यात सध्या 285 आमदार मतदान करणार आहेत. यात शिवसेनेच्या एका आमदारांचे निधन झाले आहे. तर राष्ट्रवादीच्या 2 आमदारांना मतदान करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तर आमदार क्षितीज ठाकूर बाहेर देशात असल्याने 284 आमदारच मतदान करणार असल्याने मतांचा कोटा 26 वर आला आहे. राज्यात भाजपचे 106, शिवसेनेचे 55, राष्ट्रवादीचे 53 तर काँग्रेसचे 44 आमदार आहेत. त्याचबरोबर अपक्ष आणि इतर पक्षांचे 29 आमदार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला 26 मतांची आवश्यकता आहे.

भाजपला 9 तर काँग्रेसला 8 मतांची गरज

भाजपकडे 106 चे संख्याबळ असून 7 अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. यामुळे त्यांचे 4 उमेदवार विजयी होऊ शकतात, तर 9 मते भाजपकडे जवळपास 17 मतांची गरज आहे. यामुळे त्यांना उरलेल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यात हिंतेद्र ठाकूर कुणाकडे वळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर काँग्रेसकडे 44 मते आहेत, पहिली जागा निवडून आल्यावर काँग्रेसकडे जवळपास 18 मतांचा कोटा शिल्लक राहतो, काँग्रेसला 8 मतांची गरज आहे. प्रसाद लाड यांच्यापेक्षा यंदाही भाई जगताप यांचे पारडे जड दिसते आहे. यामुळे आता निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ एक मतदार काँग्रेसला कमी लागत असला तरी निवडणुकीच्या आखाड्यात कोण कुणाला धोबीपघछाड देणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...