आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा भाजपला टोला:म्हणाले - आमच्यातली एकजूट ही संध्याकाळी दिसेल; लोकशाहीला मालक निर्माण झालेत

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेत गडबड झाली असेल, पण विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडी आणि त्यांचे सर्व आमदार हे एकजूट आहेत. संध्याकाळी आठ वाजता आमची एकजूट सर्वांना कळून जाईल. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत आहे. त्यामुळे धोका हा शब्द याक्षणी वापरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

लोकशाहीचे मालक झाले

आज विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होत असून, त्यापार्श्वभूमीवर राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. नाना पटोलेंने केलेल्या वक्तव्यावर तथ्य आहे. आमदार आपआपल्या पक्षाच्या कॅम्पमध्ये असताना देखील त्यांच्यावर दबाव, धमक्याचे फोन सातत्याने येत होते हा सर्व प्रकार आमच्यासमोर घडलेला आहे. मात्र, त्याचा कोणताच परिणाम आमच्यावर होणार नाही, लोकशाहीला जरी काही मालक निर्माण झाले असले तरी सुद्धा आम्ही या सगळ्यांवरती मात करू, असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला.

मविआत एकजूट

आजची निवडणूक ही खूप महत्वाची आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे उमेदवार नक्कीच निवडून येतील. महाविकास आघाडी ही एकजुट आहे, सर्व प्रमुख पक्षाचे नेते मुंबईत दाखल झालेले आहे, निवडणूक झाल्यानंतर आज संध्याकाळी आपण पुन्हा या विषयावर बोलू, असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...