आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर:भाई जगताप, चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी; दिल्लीतून नावावर शिक्कामोर्तब

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक पक्षात "कहीं खुशी कहीं गम" पाहायला मिळत आहे. शिवसेना , भाजपनंतर आता काँग्रेसनेही उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसकडून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

भाजपचे उमेदवार जाहीर

भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीत एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

मतदान कधी?

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह 10 जागांवर येत्या 20 जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 22 जुलै रोजी या 10 आमदारांची मुदत संपत आहे.

बातम्या आणखी आहेत...